“देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयात बरे होतात आणि सरकारच्या…”, राम सातपुतेंचा ‘मविआ’वर हल्लाबोल

मुंबई: कोरोना काळात ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला होता. यापैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. या उपचारांसाठी झालेला खर्च मात्र सरकारी तिजोरीतून वसूल करण्यात आल्याची माहिती  समोर आली आहे. १८ मंत्र्यांवरील उपचारांसाठी झालेल्या बिलाचा एकूण १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन बरे होतात आणि सरकारच्या अठरा मंत्र्यांवर खासगी पंचतारांकित रुग्णालयात उपचार केले. या सर्व मंत्र्यांच्या हॉस्पिटलचे बिल सरकारने भरले. वसुली आणि लुटारू सरकार!”, अशी टीका राम सातपुते यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रिफ, छगन भुजबळ, सुभाष देसाई, अनिल परब, जयंत पाटील यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ३४ लाख ४० हजार रुपये खर्च हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर झाला.

 

महत्वाच्या बातम्या: