पुणे : पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपुर्व बदली ही राजकीय हेतूने केलेली आहे. तसेच ही बदली आगामी महानगर पालिका निवडणूका विचारात घेऊन करण्यात आलेली आहे, असा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेल केला आहे.
पिंपरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, “पिंपरी चिंचवड चे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील संघटीत गुन्हेगारी तसेच अवैद्य धंदे आणि लँड माफीया यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत आजपर्यंत त्यांनी दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांची समक्ष भेट घेवून त्यांच्या तक्रारी सोडविण्याचा विक्रमही केला आहे. त्यामुळे ते पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे अतिशय आदरणीय अधिकारी ठरले”.
परंतु, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कोणत्याही क्षणी होणारी निवडणूक लक्षात घेवून पोलीस आयुक्तांच्या निपक्ष: कारवाईचा आपल्याला फटाका बसू नये म्हणून कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त पदावरून मुदतपुर्व बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचे जनमत हे कृष्ण प्रकाश यांची बदली रद्द होण्याच्या बाजूचे असून, सरकारने त्याचा सन्मान करीत कृष्णप्रकाश यांना पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचा आयुक्त पदाचा निर्धारित कालावधी पुर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये, अशी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे राहुल डंबाळे यांनी केली आहे”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
