मुंबई- शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. कोणताही उद्योजक कुठेही गुंतवणूक करतांना आधी मार्केट सर्व्हे करतो. तसेच शेतीचे ही आहे. शेतीतही मार्केट सर्व्हे अत्यंत गरजेचा असल्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सल्लागार अजोय मेहता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी विश्वनाथा,डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही.एम.भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ ए. एस. धवन यावेळी उपस्थित होते.
राज्यात आधुनिक शेती आणि सेंद्रीय शेतीला चालना मिळण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केले. यावेळी चारही कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंनी संशोधन, बियाणे मागणी व पुरवठा, विद्यापीठांनी संशोधन केलेले नवीन वाण, परिसर मुलाखती आदी विषयांवर सादरीकरण केले.
कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रम हा बदलत्या काळाशी सुसंगत असावा, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले. हवामान बदलावर आधारीत वाण विकसीत करण गरजेचे असून त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात एक स्वतंत्र कक्ष तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी मांडली. वनशेतीला चालना देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
भारतात कोरोनाच्या हाहाकार, मागील २४ तासांत रेकॉर्डब्रेक रुग्णाची वाढ
बकरी ईदच्या दिवशी प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही – इम्तियाज जलील
‘स्वतःचे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’
मोठी बातमी : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण
सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठीच, लोकांना त्या विकत घेण्याची गरज नाही; पुनावालांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

