मुंबई : महाविकासआघाडीतील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने ते सध्या घरीच उपचार घेत आहेत. लीलावती रुग्णालयात प्राथमिक उपचारनंतर सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत. अनेक डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस ते राजकारण्यांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीदेखील कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वैभव नाईक यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण – उद्धव ठाकरे
दुसरीकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मी कुठेही गेले नाही, सर्व काळजी घेतली. तरीही कसा संसर्ग झाला? हे माहिती नाही. माझी प्रकृती उत्तम असल्याने मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत. मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणं दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरासह स्थानिक परिसर प्रशासनाने सॅनिटाईज करून सील केला आहे.
भाजपप्रमाणे महाविकास आघाडी देखील दाबतीये विरोधकांचा आवाज, जुना जीआर पुन्हा लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

