Share

बकरी ईदच्या दिवशी प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही – इम्तियाज जलील

Published On: 

औरंगाबाद- मागील चार महिन्यांपासून लोकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. आता शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. १ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहा साजरी केली जाणार आहे. त्यासोबत श्रावण, गणेशोत्सव, मोहरम येणार आहे. त्यामुळे आता नियम, अटींसह सर्व धार्मिळ स्थळे उघडावीत; तसेच ईद-उल-अजहाची नमाज ईदगाहवर अदा करू द्यावी, अशी मागणी मौलवींची आहे. प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही, ती कशी असते, हेही शासनाने स्पष्ट करायला हवे, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पोलिस आयुक्तालयात मंगळवारी (ता. २१) मौलवी, खासदार इम्तियाज जलील यांची पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीनंतर इम्तियाज जलील म्हणाले, की १ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहा असल्याने सोमवारी शहरातील सर्व मौलवींची सुभेदारीत बैठक झाली. यामध्ये शासनाने दिलेल्या दिशा-निर्देशांवर चर्चा करण्यात आली. बकरी ईदसाठी सर्वांना ऑनलाइन जनावरे खरेदी-विक्री करणे शक्य नाही. ज्यांच्याकडे फक्त दोन-तीन बकरे आहे ते कसे विक्री करतील. त्यामुळे नियम, अटी घालून शहरातील सात-आठ मोठ्या मैदानांत जनावरांचे मार्केट सुरू करू द्यावे, अशी मौलवींची मागणी आहे. यामध्ये नियमांचे पालन केले जाईल. यावर पुढील दोन दिवसांत निर्णय घ्यायला हवा.

सरकार म्हणते, की प्रतीकात्मक कुर्बानी करावी. ही प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही. ती कशी करतात, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. आम्ही आमच्या भावना मांडल्या आहेत, पोलिस त्या शासनापर्यंत पोचवतील, असेही त्यांनी सांगितले.

सर्व मोठे सण ऑगस्ट महिन्यात येतात. आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले आहे. कोरोनासोबत आपण सर्वजण युद्ध करीत आहोत. आपल्याला प्रशासन जो आदेश देते त्याचे आपण पालन करीत आहोत. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी, असे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार दिल्लीत, आज घेणार शपथ !

कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत : नीलम गोऱ्हे

ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा ; किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र

जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे

छातीवर दगड ठेवून शासनाला हा निर्णय करावा लागला, मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!