Share

‘स्वतःचे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’

Published On: 

मुंबई – विरोधी पक्ष नेत्यांनी कुठे जाऊ नये व माहिती घेऊच नव्हे अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यामातून केला आहे. पण कोबंडे झाकले तरी सुर्य उगवायचा काही राहत नाही. विरोधी पक्ष नेत्यांना अनेक व्यासपिठे आहेत. सरकारच्या विविध व्यापिठाच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका अधिक आक्रमतेने आम्ही यापुढेही दोन्ही विरोधी पक्ष नेते नक्कीच करु अश्या प्रकारचे आश्वासन आपण महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेला देत आहोत. परंतु स्वतचे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी केली आहे.

दरेकर म्हणाले, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार लोकशाहीने दिलेल्या विरोधी पक्ष नेते या जबाबदारीच्या पदाला मर्यादा आणण्याचे काम शासनाच्या या निर्णयामुळे होत आहे. गेले काहि दिवस कोविडच्या वाढत्या प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गांभीर्याने पाऊले टाकणे गरजेचे होते. पण राज्य सरकारने व सरकारमधील पालकमंत्र्यांनी योग्य नियोजनाची व बैठकीची आवश्यकता असताना केवळ कोविडला घाबरुन अश्या प्रकारचे नियोजन केले नाही .

दरेकर म्हणाले की कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आपण राज्यात दौर केले. हॉस्पिटल, कोविड सेंटर या ठिकाणी भेट दिली. संबंधित अधिका-यांशी चर्चा करुन जी निरिक्षणे आली ती निरिक्षणे व त्यावरील उपाययोजना राज्य सरकारला सादरही केली. तेथील शासकीय यंत्रणा गतिमान करण्याचा प्रयत्नही केला. पण सरकारला आपले काम जमले नाही, सरकार नियोजन करु शकले नाही तो प्रयत्न आम्ही विरोधी पक्ष नेत्यांनी केला म्हणूनच राज्य सरकारने अश्या प्रकारचा शासन निर्णय काढून विरोधकांची मुस्कटदाबी केल्याची टिकाही दरेकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण

सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठीच, लोकांना त्या विकत घेण्याची गरज नाही; पुनावालांचा दावा

जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहणार – छगन भुजबळ

शरद पवार दिल्लीत, आज घेणार शपथ !

कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत : नीलम गोऱ्हे

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!