Share

भारतात कोरोनाच्या हाहाकार, मागील २४ तासांत रेकॉर्डब्रेक रुग्णाची वाढ

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३२ हजार ६९५ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे.

भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसांत २५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. आठ दिवसांत दोन लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत आणखी २० हजार ५७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत सहा लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख ३१ हजार १४६ रुग्ण उपचाराधीन आहेत. बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ६०६ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ९१५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

अधिकाधिक होत असलेल्या चाचण्या, वेळेवर होणारे निदान आणि प्रभावी उपचार या प्रामुख्याने तीन बाबींमुळे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?

‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’

चिंताजनक ! देशात कोरोनाने घातले थैमान, गेल्या 24 तासात सापडले 3900 नवीन रुग्ण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!