Share

Agneepath Scheme:  ‘अग्निपथ’ योजनेमागे भाजप आणि RSS चा गुप्त अजेंडा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप  

Published On: 

मुंबई: देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती  योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता यावरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अग्नीवीर या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल.”, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

https://www.facebook.com/100044427156565/posts/582590473231853/

दरम्यान देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. याविरोधात बिहारने काल बंद पुकारला होता. बिहारमध्ये आंदोलकांनी १२ रेल्वे जाळल्या असून या योजनेविरोधातील १३ राज्यांत प्रचंड विरोध केला जात आहे. त्यात बिहार आणि तेलंगणध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!