Share

गोव्यातील यशानंतर फडणवीसांचे नागपूरात थाटामाटात स्वागत  

Published On: 

नागपूर: विरोधी पक्षनेते तथा गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे गोव्यात मिळालेल्या यशानंतर नागपुरात स्वागत करण्यात आले. विजयी रॅलीदरम्यान फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी गडकरींशी संवाद साधत पाया पडून आशीर्वादही घेतले.

दरम्यान गोव्यातील अभूतपूर्व यशानंतर नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी मोठी रॅलीही काढण्यात आली होती. ही रॅली गडकरींच्या निवासस्थानाजवळ पोहोचली तेव्हा नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी फडणवीस यांचे औक्षण केले.

यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस आणि इतर पक्ष जनतेपासून तुटलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची लढाई नोटाशी होती. नोटाला देखील त्यांच्यापेक्षा चांगली मते मिळाली, असा खोचक टोला लगावला. तसेच हा विजय माझ्या एकट्याचा नसून भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे. आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. पण ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ फक्त राहिले, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!