🕒 1 min read
नागपूर : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. दरम्यान,गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाल्यानंतर ते आज (१७ मार्च) नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यावेळी बोलत असतांना आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते तरीही त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले, असे वादनविसांनी केले.
यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीने आले होते. यावेळी मी पत्रकारांना सांगितले त्यांची लढाई आमच्याशी नाही. त्यांची लढाई नोटाशी आहे, आणि तसेच झाले त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच गोवा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है,असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे.’ तसेच राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात,असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- पाकिस्तानी एजन्ट असलेल्या घोटाळेबाजासोबत बेस्टच्या ई बसचा व्यवहार- आशिष शेलार
- “केंद्रीय तपास यंत्रणा पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम…” ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
- “लोकांचे प्राण धोक्यात घालून राजकारण करण्याची मानसिकता”- संजय राऊत
- रंगाची उधळण करताना केसांची ‘अशी’ काळजी घ्या !
- IPL 2022: ‘घरी नंबर १ कोण?’ चाहत्याच्या प्रश्नाला धोनीचे मजेशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
