मुंबई: नुकतीच संपलेली भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी अतिशय संस्मरणीय ठरली आहे. मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात अश्विनने टीम इंडियाचा दिग्गज कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ विकेट घेण्याचा विक्रम मोडला. मोहाली कसोटी सामन्यात अश्विनने ६ विकेट घेतल्या होत्या. तो कपिल देवला मागे टाकत कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा फलंदाज बनला. अश्विनने नुकतेच सांगितले की कपिल देवने त्याला यानंतर पात्र पाठवले होते.
कपिल देव (kapil dev) हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू मानले जातात. भारताचा पहिला विश्वचषक जिंकून अनेक पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विनला (ravi ashwin) स्वतःचा विक्रम मोडल्याबद्दल विशेष पुष्पगुच्छ आणि हाताने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. आता अश्विनने सांगितले की कपिल देव यांनी पत्रात लिहले होते की, “अभिनंदन, मला खूप आनंद झाला की तु माझा विक्रम मोडला. तु भारताला गौरवांकित केले आहे. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा देतो.”
Early lessons & record-breaking spell ????
Lavish praise from #TeamIndia Captain @ImRo45 & legendary @therealkapildev's special gesture ????
Tribute to the late Shane Warne ????Watch @ashwinravi99 discuss it all in this special feature???? ???? #INDvSL | @Paytm https://t.co/KbyLMhJRLF pic.twitter.com/fy8nQbpQ7e
— BCCI (@BCCI) March 9, 2022
रविचंद्रन अश्विन सध्या कसोटी फॉर्मेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे अनिल कुंबळे आहे, ज्याच्या नावावर ६१९ विकेट्स आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनने एकूण १२ बळी घेतले. त्याच्याकडे आता एकूण ४४२ कसोटी विकेट्स आहेत. अश्विनला अनिल कुंबळेचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला कसोटी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. अनिल कुंबळेचा विक्रम मोडण्यात अश्विन यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तरी तुम्हाला मिरची झोंबते”, फडणवीसांची शिवसेनेवर टीका
- “आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते तरीही…”, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
- पाकिस्तानी एजन्ट असलेल्या घोटाळेबाजासोबत बेस्टच्या ई बसचा व्यवहार- आशिष शेलार
- विवेक अग्निहोत्रींचा नमाज अदा करताना फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…
- IPL 2022: ‘घरी नंबर १ कोण?’ चाहत्याच्या प्रश्नाला धोनीचे मजेशीर उत्तर


