Share

“…तरी तुम्हाला मिरची झोंबते”, फडणवीसांची शिवसेनेवर टीका 

Published On: 

मुंबई: देशात आणि राज्यात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चांगलेच राजकारण रंगताना दिसून येत आहे. राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावरच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“काश्मीरसंदर्भात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आणि आता उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे वर्तन यांच्यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू’ या गाण्यातील बोल शिवसेनेला लागू पडतात. कुठे बाळासाहेब यांचे जाज्ज्वल्य हिंदूुत्व, जे कश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि कुठे आताची शिवसेना.आज काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला मिरची झोंबते, इतकी शिवसेना का बदलली”, असा खोचक सवाल करत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान “महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत.”, असा टोला संजय राऊत यांनी काल लगावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या सिनेमामुळे भाजप-सेनात वाद रंगला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!