Share

शिवाजी महाराजनंतर आता क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचीही विटंबना; बेळगावात तणाव

Published On: 

🕒 1 min read

कर्नाटक: बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता यातच काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (revolutionary Sangoli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती समोर येत आहे.

क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या गळ्याभोवती लाल-पिवळा झेंडा गुंडाळला असून हात कापडाने बांधले आहेत. यानंतर सदाशिनगर बंगळूर येथे शिवप्रेमी आक्रमक झाले असून याभागात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केले असून खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात कलम १४४ जारी केला आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद बेळगावात उमटले आहेत. याभागात संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत २० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. तर आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!