मुंबई : राज्यात शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर निर्णय घेण्यात सुरुवात झाली आहे. मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा शिंदे सरकारकडून फेरविचार केला जाणार आहे. यातील काही निर्णयांना शिंदे सरकारकडून विरोध केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे आरे येथील मेट्रो कारशेडचा मुद्दा. उद्धव ठाकरे सरकारने आर येथे मेट्रो कार शेड उभारण्याचा निर्णय रद्द केला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या या सरकारने मेट्रो कारशेड हे आरे येथेच होईल असे जाहीर केले आहे. राज्यभरातील पर्यावरण प्रेमींनी शिंदे सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या सरकारच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना टोला लगावला आहे.
‘मी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी मी कोणतीही करवाड केली नव्हती, दोन वर्ष कोरोनात गेले. त्यामुळे विकास कामावर परिणाम होऊ नये म्हणून आम्हाला इंधनावरील व्हॅट कमी करता आला नाही. दीड लाख कोटी पगार आणि पेन्शनवर जातात. व्हॅट कमी केला असता तर काही हजार कोटींचा फटका बसला असता. मधल्या काळात शेतकऱ्यांचे निर्णय घेतले गेले. त्यांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती. मात्र नवीन सरकारने तुमच्यासाठी काहीतरी निर्णय घेतला हे दाखवण्यासाठीच शिंदे सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला असावा.’ असा टोला माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते
दरम्यान सभागृहातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तर नावे सर्वांना समजली. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीतून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी राष्ट्रवादीतील जयंत पाटील तसेच अजित पवार व इतर काही नेत्यांची नावे समोर आली होती. मात्र आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली आहे.
अजित पवार यांनी सत्तेत असताना उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, अर्थमंत्री अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. अजित पवार यांनी ही खाती केवळ सांभाळली नाही तर त्या खात्याचा मंत्री म्हणून आपल्या काळात वेगळी छापही पाडली आहे. अशा अजित पवार यांची आज विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वी विरोधी बाकांवर बसली, मात्र विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांनी याअगोदर कधी भूषविलेला नाही. त्यामुळे हे पद सांभाळताना अजित पवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


