🕒 1 min read
पुणे : मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे काल अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचे काल उदघाटन पार पडले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर मंत्री तसेच शिवसेनेचे नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते.
या पुतळ्याच्या उदघाटनानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या पुतळ्या संदर्भात प्रश्न केला असता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगत आहेत की, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला’ असा टोला आठवलेंनी लगावला आहे.
‘उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत परत यायला हवं’ असा सल्ला देखील त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचं सरकारचं भविष्य आपल्याला दिसत नाही. एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल किंवा दोन्ही पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील.’
दरम्यान, या उदघाटन समारंभावेळी अनेक सर्वपक्षीय नेते, मंत्री उपस्थित असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीनंतर राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. . तर अजित पवार पुण्यात असल्याने ते उपस्थित राहू न शकल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजब सरकारच्या काळातील अजब घोटाळे आता उघडकीस येतायत’
- कोरोना पूर्ण जात नाही तोपर्यंत परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील – उदय सामंत
- अगस्तीतील शुक्राचार्य कोण ओळखा अन् त्यांना बाजूला करा; शरद पवारांची पिचडांवर टीका
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- गंभीर ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनंतर मंत्रालयातील ‘त्या’ फायलीचा शेराच बदलला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
