🕒 1 min read
अहमदनगर:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सध्या नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर या निवडणुकांची चर्चा रंगत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै.यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर 200 कोटीच कर्ज झाले, जे या कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत मी करतो, असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा मराठा विद्यार्थ्यांसोबत विरोधी पक्षनेते उपोषणाला बसणार !
- कोरोना पूर्ण जात नाही तोपर्यंत परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील – उदय सामंत
- ‘एल्गार परिषदेचे ना वक्ते माहित ना परिषदेचा उद्देश मग पोलिसांनी परवानगी कशी काय दिली?’
- यंदा लाल रंगाच्या कपड्यातील अर्थसंकल्पाची परंपरा मोडणार !
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळकेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !

