Share

गंभीर ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनंतर मंत्रालयातील ‘त्या’ फायलीचा शेराच बदलला !

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते पडण्याचा प्रयत्न विरोधकांसोबतच काही अधिकारी मिळून करत असल्याचा गौप्यस्फोट महाविकास आघाडीतील एका बड्या मंत्र्याने केला होता. खुद्द मंत्र्यानेच हा दावा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता हा संशय खरा आहे की काय ? याच्या शक्यता बळावल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण गंभीर असून मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेरा देऊन सही केली होती. परंतु, या फायलीवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सही केली होती, त्याच्या वरील मोकळ्या भागात लाल रंगाच्या पेनाने नवीन शेरा लिहण्यात आला होता. चौकशीनंतर ही फाईल बंद करावी, असा तो शेरा होता. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

‘ती’ फाईल नेमकी कसली ?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. जेजे स्कूल ऑफ आर्ट इमारतीच्या बांधकामामध्ये आर्थिक अनियमितता समोर आली होती. त्यानंतर वरिष्ठ अभियंता असलेले नाना पवार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात ही फाईल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!