Share

‘अजब सरकारच्या काळातील अजब घोटाळे आता उघडकीस येतायत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण गंभीर असून मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बाब उघडकीस आल्यानंतर भाजप नेत्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. भाजप नेते आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात अजब युती होऊन अजब सरकार सत्तेत आले आणि या अजब सरकारच्या काळातील अजब घोटाळेही उघड होऊ लागलेत’ असा टोला आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘ठाकरे सरकारमध्ये फाईल घोटाळा झाला असून मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावरील शेरा बदलण्यात आला. याबाबत विधानसभेत मागणी केल्यानंतर आता फौजदारी कारवाई सुरु झालीये,’ अशी माहिती देखील शेलारांनी दिली आहे.

काय आहे हे प्रकरण ?

टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेरा देऊन सही केली होती. परंतु, या फायलीवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सही केली होती, त्याच्या वरील मोकळ्या भागात लाल रंगाच्या पेनाने नवीन शेरा लिहण्यात आला होता. चौकशीनंतर ही फाईल बंद करावी, असा तो शेरा होता. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!