Share

गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

जालना : अंबड चौफुली येथील मैदानात अनेक आजी माजी मंत्र्यांची उपस्थितीत ओबीसी समाजाचा विशाल मोर्च्या काढण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ओबीसी समाजासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेकडून त्यांना मिळाली असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले कि, “ओबीसी समाजाची धुरा गोपीनाथ मुंडे यांच्या  नंतर आता भुजबळ साहेबांकडे आहे, सर्वच समाजाचे प्रश्न सुटत असताना ओबीसी समाजाला जाणूनबुजून दुर्लक्षित केलं जातंय, ओबीसी समाजावर जो कोणी अन्याय करेल त्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, इतके दिवस जाती-पातींमध्ये भांडणे लावून समाजाला एकत्रित येऊ दिल गेल नाही परंतु सध्या संपूर्ण ओबीसी समाज एकजूट झालेला आहे यामुळे समाजाच्या हक्काच जर का कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही” असे ते म्हणाले .

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ओबीसी समाजातील नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला आहे. मोर्चामध्ये ढोलताशा पथके आणि विविध वाद्य परंपरागत नृत्य आणि गीते सादर केली जात आहेत. विशेष म्हणजे बंजारा महिला आणि पुरूषांच्या नृत्य प्रकाराने परिसरात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या सगळ्या भागातील ओबीसी समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!