Share

आशिष शेलारांच्या टीकेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाळ्या आधी होणाऱ्या नालेसफाई कामाची झाडाझडती घेण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मुंबईतील मान्सूनपूर्व कामाचा काल आढावा घेतला. यानंतर आशिष शेलार यांनी ट्वीट करत जोरदार टीका केली होती. यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“मी टीका करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही. टीका, आरोप होत असतात. पण या व्यतिरिक्त त्यांना काही चांगलं सुचलं आणि त्यांनी सूचना दिली तर नक्कीच आम्ही विचार करु.” अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला.

आशिष शेलारांनी कोणती टीका केली होती?

“भाजपाने नालेसफाईच्या कामाची दुसऱ्यांदा झाडाझडती घेण्याचा आजचा कार्यक्रम काल दुपारी ठरवला. संध्याकाळी घोषित केला. पालकमंत्र्यांना कळताच काल संध्याकाळी म्हणे त्यांनी कामांची धावती पाहणी केली.  एवढे दिवस कुठे होतात? सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार!” असा शब्दात आशिष शेलार यांनी ट्वीट करत मुंबईतील मान्सूनपूर्व कामावर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!