Share

IPL 2022 KKR vs LSG : १५ चेंडूत ४० धावा फटकावणारा रिंकू सिंह नक्की आहे तरी कोण? वाचा त्याचा प्रेरणादायी प्रवास!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६६वा सामना काल लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईतील डी वाय स्टेडीयमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊने कोलकातावर २ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून लखनऊने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या केएल राहुल नाबाद ६८ धावा आणि क्विंटन डीकॉकच्या नाबाद १४० धावांच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना कोलकातापुढे २११ धावांचे आव्हान ठेवले होते. कोलकाता संघाने चांगली लढत दिली आणि जिंकता जिंकता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंहने सर्वांची मने जिंकली. त्याने कोलकातासाठी १५ चेंडूत ४० धावांची धमाकेदार खेळी केली. मात्र तो बाद झाल्याने कोलकाताला सामना गमवावा लागला.

लखनऊने सामना जिंकल्याने त्यांचे गुणतालिकेत १८ अंक झाले आहेत. त्यामुळे ते प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. गुजरातनंतर आता लखनऊ दुसरा संघ स्थानी आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघाचा पराभव झाल्याने कोलकता संघाचे प्लेऑफचे आव्हान संपले आहे. उरलेल्या दोन जगासाठी आजूनही ४ संघ झुंज देत आहेत.

कोण आहे रिंकू सिंह ?

कोलकाता विरुध्द लखनऊ सामन्यामुळे चर्चेत आलेल्या रिंकूचा इथपर्यंतचा प्रवास सोपा आणि सहज नव्हता. रिंकू हा पाच भावंडांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा होय. त्याचे वडील गॅस सिलिंडर घरी पोहोचवण्याचे काम करायचे. रिंकूचा एक भाऊ रिक्षा चालवतो तर दुसरा कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करतोय. रिंकू नववीत नापास झाला, शिक्षण न झाल्याने चांगली नोकरी देखील मिळत नव्हती. जेव्हा रिंकूने भावाकडे नोकरीची विचारणा केली तेव्हा त्याला झाडू मारण्याची नोकरी मिळत होती. अशा बिकट वातावरणात रिंकूने क्रिकेटवर फोकस करण्याचे ठरवले. २०१५ साली कुटुंबावर ५ लाखाचे कर्ज होते. त्याने उत्तर प्रदेश अंडर-१९ संघाकडून खेळताना मिळणारे दैनिक भत्ते आणि अन्य पैसे एकत्र करून कुटुंबाचे कर्ज फेडले. २०१७ साली केकेआरने त्याला ८० लाख रुपयांना खरेदी केले. या वर्षी लिलावात रिंकूला ५५ लाख रुपये मिळाले. आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त त्याच्या फिल्डिंगची चर्चा होती. पण त्याला जेव्हा फलंदाजी करण्यची संधी मिळेल तेव्हा त्याची बॅट काय करू शकते हे काल सर्वांना दाखवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!