Share

पंचांना बॅट दाखवणं पडलं महागात! ICC कडून ‘स्टार’ क्रिकेटरवर मोठी कारवाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयसीसी (ICC) कडून झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याला मॅच फीच्या अर्धा टक्का दंड ठोठावण्यात आला आहे. नामिबियाविरुद्ध बुलावायो येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

ही बाब झिम्बाब्वेच्या डावातील १६व्या षटकाची आहे. सिकंदर रझाला गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर पायचीत दिले. मात्र, सिकंदर रझा अंपायरच्या या निर्णयावर खूश नव्हता आणि त्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. रागाच्या भरातही त्याने अंपायरला आपली बॅट दाखवली आणि अनेक चाहत्यांना आणि क्रिकेटतज्ज्ञांना याचा आनंद झाला नाही. सिकंदर रझाचा राग मैदानापुरता मर्यादित नसून तो ड्रेसिंग रूममध्येही रागात दिसला.

त्यानंतर रझा यांना आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.८चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. सिकंदर रझालाही दोन डिमेरिट गुण देण्यात आले. त्याने मॅच रेफरीसमोर आपली चूक मान्य केली आणि त्यामुळे पुढील सुनावणीची गरज भासली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!