🕒 1 min read
मुंबई :- ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. हृताने प्रियकर प्रतिक शाह याच्यासोबत डिसेंबरमध्ये साखरपुडा केला होता. पण हृताने बुधवारी सोशल मिडीयावर फोटो शेअर करत लग्न झाल्याची चाहत्यांना माहिती दिली. लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी हृता आता मिसेस हृता प्रतिक शाह म्हणून ओळखली जाणार.
या लग्न सोहळ्यासाठी मोजकेच लोक उपस्थित होते. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी तिच्या आगामी ‘अनन्या’ सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रताप कड उपस्थित होते. यासोबतच अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत आणि मनोरंजन सृष्टीतील काही मान्यवरांनी या विवाहासाठी हजेरी लावली.
सोशल मिडीयावर हृताने लग्नाचे फोटो शेअर केले, तेव्हापासून चाहत्यांनी तिच्यावर आणि प्रतीकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. लग्नासाठी हृताने सुरेख अशा साडीला प्राधान्य दिल होत. त्याचबरोबर दागिने, मेकअप आणि तिच्या चेहऱ्यावर असणारी चमक हृताच्या लुकला चार चाँद लावून गेली.
जाणून घ्या नेमका कोण आहे प्रतिक शाह?
हिंदी मालिकेतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता शाह यांचा मुलगा प्रतिक शाह आहे. बऱ्याच हिंदी मालिकांच दिग्दर्शन प्रतिक करतो. ‘तेरी मेरी इक जिंदगी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ या सर्व मालिकांची नावं प्रतीकसोबत जोडली जातात. या दोघांची जोडी पाहता त्यांच्या प्रेमाच्या मालिकेचीही दणक्यात सुरवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
