Share

“स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, हनुमान चालीसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आज (१० एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटून उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत’, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, दादरमध्ये मनसेकडून शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली, त्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तद्पश्चात यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. ते म्हणाले की,‘ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपले हिंदुत्व सोडले. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात.’

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!