Share

उद्यानाला नगरसेवकाच्या वडिलांचं नाव देण्यास नागरिकांचा विरोध

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या वडिलांच्या नावावर महपालिकेच्या उद्यानाचे नामकरण करावे अशी मागणी केल्याने पुण्यातील सॅलीसबेरी पार्क मधील रहिवासी नाराज झाले आहेत. मागील तीन आठवड्यापासून त्यांनी शांतेच्या मार्गाने निदर्शने केली आहेत. या प्रस्तावाच्या निषेधार्थ रॅली ही काढली आहे. गुल पुनावाला उद्यानाजवळील पुणे महानगरपालिका उद्यानाचे उद्धाटन नोव्हेंबर २०२१ मध्ये झाले होते. मात्र गेल्या महिन्यात भाजप नगरसेवक यांनी दिवंगत वडील यशवंतराव भिमाले यांचा नाव देणारा फलक लावला आहे .

पत्रकार विनिता देशमुख यांनी सुरु केलेल्या नवीन बोर्ड हटाव या ऑनलाईन याचिकेवर एकूण ८८३ स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. १९९० च्या दशकात पुणे महानगरपालिकेने हा भूखंड भाडेतत्वावर दिल्यानंतर ह्या उद्याची गाथा सुरु झाली. ही जमीन बागेसाठी आरक्षित होती. पण शहरातील एका बड्या बिल्डर देण्यासाटी ती बेकायदेशीररित्या रद्द करण्यात आली.

२५ नोव्हेम्बरला या बागेचे उद्धाटन होणार होते. भीमाले यांच्याशी झालेल्या बैठकीत बागेला एका व्यक्तीचे नाव दिले जाणार नाही. किंवा राजकीय पक्षही संबंधित असणार नाही, यावर चर्चा झाली, असे स्थानिक रहिवासी पुनावाला म्हणाले.

“…तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली”, यशवंत किल्लेदारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
अखेर वसंत मोरेंच्या मेसेजला रिप्लाय; राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावले!
शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत!
शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
“तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका” – अजित पवार 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!