🕒 1 min read
कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये बोलत असताना अनेक मुद्यांवर भाजपवर टोलेबाजी करत असताना पाहायला मिळाले. यामध्ये केंद्र सरकारमुळे देशावर वीज संकट आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात तसेच अवघ्या देशावर वीज संकट आहे. केंद्र सरकारच्या राजकारणामुळे देशावर वीजेचे संकट ओढवले आहे. राज्यातील वीजेच्या संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे’. असा थेट आरोप त्यांनी केला.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवण्यातही भाजपाचा हात असल्याचे बोलले. भाजपाचं पहाटेचं सरकार गेल्यामुळे हा गोरखधंडा सुरु आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागचा बोलविता धनी लवकरच समोर येईल. आम्ही विकासापासून दूर नाही, तर भाजप विकासापासून दूर आहे. सत्तेचा माज व सत्तेची नशा भाजपला आहे. जे त्यांच्याविरोधात बोलतात त्यांच्यामागे भाजप ईडी लावतात. देशात हिटलरशाही, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
“राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी करायला निघालेत”; नाना पटोलेंचा घणाघात
“…तो मुद्दाम चित्रित केलाय”, कीर्तनकारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया
“शरद पवारांमुळेच मी इथं”; नवनीत राणांनी उधळली स्तुतीसुमने
“…तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली”, यशवंत किल्लेदारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
अखेर वसंत मोरेंच्या मेसेजला रिप्लाय; राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
