मुंबई : दिल्ली कॅपिटल्सच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर लढत पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतच्या दिल्लीसमोर आज श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान आहे. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या हंगामात केकेआर संघ चारपैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी दिल्लीच्या संघाने तीनपैकी दोन सामने गमावले असून ते सातव्या स्थानावर आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर खूप संतुलित दिसत आहे आणि पॅट कमिन्सच्या आगमनाने संघाला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये ताकद मिळाली आहे. उमेश यादव सातत्याने विकेट घेत असून, हे संघासाठी चांगले लक्षण आहे.
गेल्या सामन्यात दिल्लीसमोर अनेक अडचणी होत्या. कर्णधार पंत, डेव्हिड वॉर्नर आणि एनरिक नॉर्किया यांना लवकर लयीत परतावे लागेल. पृथ्वी शॉचा फॉर्म संघासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.
दोन्ही संघांची Playing XI
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कप्तान/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या –
- उद्यानाला नगरसेवकाच्या वडिलांचं नाव देण्यास नागरिकांचा विरोध
- “…त्यांचा हेतू स्वछ नव्हता”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
- “केंद्र सरकारच्या राजकारणामुळे देशावर वीजेचे संकट” – नाना पटोलेंचा आरोप
- IPL 2022 : चहलच्या धक्कादायक खुलाशानंतर मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ खेळाडूची चौकशी होणार; वाचा कोण आहे तो!
- IPL 2022 : RCBचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन; मुंबईविरुद्धची मॅच खेळताना समजली वाईट बातमी!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

