मुंबई : महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे व भाजप यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आरे येथील मेट्रो कारशेडबाबत मोठा निर्णय घेतला. मागील महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या आरे येथे कारशेड बनवण्याच्या निर्णयाला रद्द केले होते. मात्र आता राज्यात एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे पुन्हा सरकार आल्याने त्यांनी मेट्रो कारशेड आरेतच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे पडसाद आता पर्यावरण प्रेमींमध्ये पाहायला मिळत आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबईत ‘आरे वाचवा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ही सहभागी झाले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, हा निर्णय घेणे म्हणजे या सरकारचा द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा. अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच राज्यात नव्याने स्थापन झालेले हे सरकार मुंबईसह महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचेही ते म्हणाले.
‘या सरकारने पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात घेतला आहे. अरे येथे फक्त झाडं तोडली जाणार नाहीत तर प्राणी पक्षांचाही मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मागील सरकारने याबाबतच्या निर्णयाला रद्द करून कांजूर येथे कारखेड उभारण्याचे ठरवले होते. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो. त्यामुळे या सरकारने पूर्णपणे महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला आहे.’ असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. “आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणं आहे,” असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे. द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा, अशी ती काही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली.
Mumbai | Whatever anger they (Maharashtra Govt) have against us should not be taken out on city. Jungles & environment need to be protected, climate change upon us. We had proposed construction to be turned into a veterinary hospital for jungle: Shiv Sena leader Aaditya Thackeray pic.twitter.com/TwrWpxBawa
— ANI (@ANI) July 10, 2022
‘मागील महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना या सरकारने कृपया स्थगिती देऊ नये. तसेच सरकारने राज्याच्या विकासाच्या विचाराने काम करावे. मागील सरकारच्या विरोधात द्वेष भावनेने किंवा रागाने जनतेच्या हिताच्या निर्णयांना स्थगिती देऊ नये’ असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

