Share

Aaditya Thackeray : ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटावर टीकास्त्र

Published On: 

मुंबई : शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेनेत गळतीच सत्र सुरूच आहे. यानंतर हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून सुरवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतायत.

याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यानी ही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटावर केली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला. जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारं सदैव खुली असतील, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

दरम्यान, यानंतर शिंदे आणि शिवसेना गटातील वादाचे हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. दोन्ही बाजूंकडून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. असे असतानाच विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावल्या आहेत. दोन्ही बाजूंकडून आपलाच पक्ष खरा असे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. म्हणून या आमदारांना 7 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. यावेळी शिवसेना कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा सवाल उपस्थित झाल्याने नोटीस बजावलेल्या आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!