Share

Eknath Shinde : शिवसेनेत गळती सुरूच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर पुण्यातील ‘हे’ नेते देणार राजीनामा

Published On: 

पुणे : ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तसेच पुढे कल्याण डोंबिवलीतील ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंना समर्थन दिल आहे. असं असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना आता पुण्यात देखील मोठा फटका बसला आहे.

एकनाथ शिंदेंनी हडपसर येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची ही भेट उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखीची ठरली. शिंदे यांनी पुणे शहरात शिवसेनेला खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी आज राजीनामा देणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील, अशी माहिती समोर येत आहे. पुढे शहराचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ते उद्धव ठाकरेंकडे आपला राजीनामा सोपवितील. तसेच पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती.

दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढणार आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून सुरवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतायत. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!