Share

Radhika Apte : राधिका आपटेन सांगितलं स्वतःच्या लग्नात फोटो न काढण्याचं कारण? म्हणाली,आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. राधिकाचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहील आहे. काही वर्षांपूर्वी राधिकाने लंडनमध्ये स्थायिक असलेला संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी स्वतः च्या लग्नात फोटो काढले नाहीत. आता याबाबत राधिकाने एक खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये राधिकाने खुलासा केला त्यावेळी ती म्हणाली, “आम्ही फोटो काढले नाहीत कारण माझ्या नवऱ्यासह आम्ही सगळेच तेव्हा नशेमध्ये होतो. म्हणून माझ्या लग्नाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण हे एका अर्थी चांगलं देखील आहे. माझ्या नवऱ्याला खरं तर फोटो काढण्यामध्ये रसच नाही. आता त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा झाली आहे. आम्ही फिरायला जातो तेव्हा फोटोसाठी तो पोझ देतो.”

https://www.instagram.com/p/Cfn5eHsM5Ai/

राधिकाच्या या वक्तव्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. नृत्य प्रशिक्षणासाठी राधिका जेव्हा लंडन येथे गेली तेव्हा तिची ओळख बेनेडिक्टशी झाली होती. २०१२मध्ये राधिकाने बेनेडिक्टबरोबर लग्न केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!