Share

अभिनेत्री सोनम कपूरच्या सासऱ्यांची झाली फसवणूक, 27 कोटी रुपयांचा लागला चुना..

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचे सासरे हरीश अहुजा  यांना 27 कोटी रुपयांचा चुना लागला आहे. फरिदाबाद पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या  टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने हरीश अहुजा यांच्या शाही एक्स्पोर्ट फॅक्टरी या आयात-निर्याती करणाऱ्या कंपनीची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. तेव्हापासून फरिदाबाद पोलिसांची एक टीम या प्रकरणावर काम करत होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कर्नाटकसह देशातील विविध ठिकाणांहून त्यांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींमध्ये माजी लिपिक आणि परदेशी व्यापार महासंचालनालयाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हे आरोपी डीजीएफटीच्या कामकाजात पारंगत होते. मनोज राणा, मनीष कुमार, प्रवीण कुमार, ललित कुमार जैन, मनीष कुमार मोगा, भुसन किशन ठाकूर, सुरेश कुमार जैन, गणेश परशुराम, राहुल रघुनाथ आणि संतोष सीताराम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

कशी झाली फसवणूक?

सरकार निर्यात कंपन्यांना आरओएससीटीएल परवान्यांच्या स्वरूपात काही इन्सेन्टिव्ह देते. यामुळे त्यांना उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कात काही सूट मिळू शकते. हे आरओएससीटीएल परवाने काही लाख रुपयांच्या डिजिटल कूपनसारखे असतात. फसवणूक करणाऱ्यांनी आहुजांच्या फर्मचे 27.61 कोटी रुपये किमतीचे एकूण 154 आरओएससीटीएल मिळवले होते. हे कूपन्स ते त्यांच्याद्वारे उघडलेल्या बनावट कंपन्यांमध्ये हस्तांतरित करत होते, अशी माहिती फरिदाबादचे पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या ;

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!