अहमदनगर : आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचा चांगलाच धुव्वा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित होते म्हणून मी भाजपमध्ये आलो’, असं वक्तव्य करत काँग्रेसवर जोरदार टोलेबाजी केली.
केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच “महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष लाचार बनलाय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी होत आहे. काँग्रेसनं आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवी सुरुवात करावी”, असा जोरदार टोला सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला लावला आहे. त्याचबरोबर शिवसेनेची स्पर्धा ही नोटाबरोबर असल्याचे गोवा आणि उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले. ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. गोव्याच्या जनतेनं शिवसेनेला नाकारले अशी टीका सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

