Share

आदित्य ठाकरेंना दाखवले काळे झेंडे; मनसैनिकांना घेतले ताब्यात

Published On: 

मुंबई: पूर्व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूर्व मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी आले आहेत. कांजुर येथील परिवार उद्यानाचे उद्घाटन देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे. परंतु या सोहळ्याला मनसेने आक्षेप घेतला आहे. ज्या विकासकामांचे काम पूर्णच झाले नाही. त्याचे उदघाटन कशासाठी? असा सवाल मनसे तर्फे विचारण्यात येत आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे याठिकाणी आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी सुमारे एक कोटी ७० लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. परंतु नुतनीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मग अर्धवट अवस्थेत असलेल्या या उद्यानाचे उद्घाटन करण्याची घाई कशाला करता? असा सवाल मनसेने केला आहे. आज आदित्य ठाकरे उद्यानाचे उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत होते. परंतु या कार्यक्रमाआधीच मनसेचे विक्रोळी विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासहित इतर कार्यकर्त्यांना कांजूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!