Share

Women’s WC 2022: वेस्ट इंडिजला परास्त करत भारतीय संघ पहिल्या स्थानावर विराजमान!

Published On: 

मुंबई: हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी शानदार विजय नोंदवला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाची ही अष्टपैलू कामगिरी होती. सोबतच भारतीय संघाने पॉईंट्स टेबलवर अव्वल स्थान गाठले आहे. भारताने २ सामने जिंकत टेबल टॉप केला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात भारताकडून स्मृती मंधानाने (smriti mandhana) १२३ आणि हरमनप्रीत कौर (harmanpreet kaur)१०९ च्या केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ८ बाद ३१७ धावा केल्या. यानंतर गोलंदाजांनी डळमळीत सुरुवातीने वेस्ट इंडिजने पहिल्या विकेटसाठी १०० धावा केल्या. गोलंदाजीत स्नेह राणाने (sneh rana) तीन बळी घेतले तर मेघना सिंगने दोन बळी घेतले ज्यामुळे पुढे वेस्ट इंडिजला केवळ ६२ धावा करता आल्या आणि अखेरीस ते १६२ धावांवर सर्वबाद झाले.

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत या विजयासह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. झालेल्या ३ सामन्यात भारताने २ विजय मिळवले. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला मोठ्या अंतराने पराभूत केल्याने संघाचा नेट रनरेट वाढला आणि भारतीय संघाने पॉईंट्स टेबलवर आघाडी घेतली आहे. भारतानंतर ऑस्ट्रलिया संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!