Share

Amol Mitkari | अमोल मिटकरींवर कारवाई होणार? गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनमध्ये धक्का-बुक्कीच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी खूपच चर्चेत होते. दरम्यान अमोल मिटकरी यांच्यावर कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी देखील भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी हे कमिशन खोरी केल्याशिवाय आमदार निधी वाटप करत नाही अश्या बातम्या येत आहे. या आधारे भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भातील चौकशी करण्याची विनंती केली आहे. असा गैरव्यवहार होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशे मत धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.

अमोल मिटकरी कमिशन घेत असल्याचा आरोप-

अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याने अमोल मिटकरी कमिशन घेत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे ही तक्रार केली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

आमदार साहेबांकडे पैसे देऊन निधी मागतोय-

यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक पदाधिकारी जिल्हाध्यक्षांना प्रश्न करत आहे. आम्ही आमदार साहेबांकडे पैसे देऊन निधी मागतोय. पण आम्हाला निधी दिला नाही, जो जिल्हाध्यक्षांना दिला. तो कशाप्रकारे दिला हे त्यांना कृपा करून विचारा.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!