🕒 1 min read
सातारा : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात आमदार मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेचा आणि पैशाचा उन्माद असणाऱ्या चुकीच्या लोकांना निवडून देऊन पुन्हा चूक करू नका असं म्हणत त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. अब्दुल सत्तार आणि शहाजी बापू हे शिंदे गटाचे वाचाळवीर असल्याचं म्हणत अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार आणि शहाजी बापू शिंदेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या पीएला शिवीगाळ केली. सत्तेच्या आविर्भावात ते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना महाराष्ट्र त्यांनी चांगल्या रीतीने सांभाळला. अजित पवारांच्या कामाची दखल कॅगने घेतली आहे. जर चुकून फडणवीस किंवा मुनगंटीवार त्यावेळी अर्थमंत्री असते तर त्यांनी महाराष्ट्र भिकेला लावला अशी घणाघाती टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
भाजपाचा उन्माद थांबवण्याची ताकद फक्त पवार साहेबांमध्येच आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला बळकट करा. बाळासाहेब देवरस या आरएसएसच्या देवाचे नाव शिंदे गटाला मिळालंय. हा शिंदे गट भाजपात विलीन व्हावा हीच देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे. पण, लवकरच हे सरकार पडेल. डिसेंबरमध्ये गुजरातच्या बरोबर कदाचित महाराष्ट्रातही निवडणूका लागतील. आपण या निवडणुकीसाठी तयारी करावी, असं आवाहन देखील अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
अंधेरीची जागा आम्हीच जिंकणार
अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेत सुद्धा भगवा फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । ज्यांचं रक्त गोठलेलं आहे, तीच लोक चिन्ह गोठवू शकतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Gulabrao Patil | राजीनाम्यावरुन महाभारत! उद्धव ठाकरे गटाच्या आरोपांना गुलाबराव पाटलांचं साडेतोड उत्तर, म्हणाले…
- Narendra Modi । कोरोनाची भविष्यवाणी करणाऱ्या महंतांचे मोदींनी घेतले आशीर्वाद, नव्या भविष्यवाणीने टेन्शन वाढले
- Keshav Upadhye | “नाना तुमच दुःख…”, नाना पटोलेंच्या ‘त्या’ टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर
- Ambadas Danve | इथे निवडणूका होतील तेव्हा हनुमान चालीसा म्हणायला लोकं तुम्हाला घरी बसवतील – अंबादास दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
