Share

Uddhav Thackeray | मी पुन्हा येईन! उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणार असल्याची घेतली शपथ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलं असून,’मशाल’ हे चिन्ह दिलं आहे. अशातच उरणमधून काही शिवसैनिक मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा आपण पुन्हा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री होणार असल्याची शपथ घेतली आहे. यावरुन अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

सदस्य नोंदणी करा कागदांची लढाई हारता कामा नये, मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांन समोर घोषित केलं. शिवसेना संपवण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न होतो, त्यावेळी शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चार पटीने उभी राहते, असं देखील ते म्हणाले.

काही काळासाठी आपलं चिन्ह गोठवलेले आहे. पण मला दुःख या गोष्टीच होत कि, ज्या चिन्हाची पूजा आजही आपल्या घरात होते. ते धनुष्यबाण तसंच ठेवलेलं आहे. आजपर्यत अनेकांनी शिवसेना संपवण्यासाठी वार केले. पण शिवसेना संपवण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता. शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता. हे फक्त ज्यांचं रक्त गोठलेलं आहे, तीच लोक हे करू शकतात, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मी शिवतीर्थावर जे बोललो तेच आज मी इथेही बोलत आहे. ही माझी भावना आहे. शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या 56 वर्षांमध्ये शिवसेनेने असे 56 जण पाहिले. मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे शिवसेना संपली नाही तर त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली आहे, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!