गुवाहाटी : शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर पक्षविरोधातच बंड पुकारले. जवळपास आमदारांसोबत ते आतापर्यत गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये होते. त्यामुळे राज्यातील महाविकासाआघाडी सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेंबाबत एक मोठी माहित समोर आली आहे.
आज पहाटे सूरतहून एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले.
गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यासोबत एकूण 40 आमदार आहेत. शिवसैनिकांनी कुठलही बंड केलं नाही. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही, असंही ते म्हणालेत.
दरम्यान, याआधी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर आलाय. हे सर्व आमदार आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या :


