🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यातील महाविकासाआघाडी सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेना आणि जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यातील वाद अजूनतरी मिटताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.
आज दिवसभरातील शिवसेनेसाठी हा दुसरा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. मागील ९ तासांपासून अनिल परब यांची ईडी चौकशी सुरु आहे. त्याचवेळी परब यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा गंभीर आरोप केला होते.
यानंतर त्यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर आज सकाळपासून ईडी कार्यालयात परब यांची चौकशी सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे जवळपास 30 पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरतमधील मेरेडीयन हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या आज समोर आल्या आहेत. शिवसेना आणि शिंदे यांच्यातील वाद अजूनतरी मिटताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
