Share

Eknath Shinde & Bacchu Kadu Update – एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर

Published On: 

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) नाराज आमदारांसह गुजरातला आहेत. भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणात भुकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पहिल्याच रांगेत बसले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत खळबळ उडाली आहे. सकाळी उद्धव ठाकरेंचे उजवे हात असलेले एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर गेले होते. मात्र या भेटीला यश आले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आणि भाजपासोबत या, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवला.

एकनाथ शिंदे जवळपास 30 पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरतमधील मेरेडीयन हॉटेलमध्ये आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे रात्रीच सुरतला रवाना झाले होते.  एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी अट उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली आहे. त्यांची नाराजी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!