सुरत : सध्या महाराष्ट्रात मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. शिवसेना आणि जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यातील वाद अजूनतरी मिटताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे यांचा फोनवरून संपर्क झाल्याची माहिती tv9 मराठी या वृत्तवाहिनीने दिली आहे.
नार्वेकर आणि शिंदे यांच्या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले. या संवादात एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं संतापून म्हणाले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले?, असं शिंदे संतापून म्हणाले आहेत.
तसेच पुढे यावेळी शिंदे यांनी संजय राऊतांबद्दल प्रखर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतायेत. भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतायेत असा सवाल त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

