🕒 1 min read
शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (21 जून, मंगळवार) महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे. गुजरातमधील सुरत येथील ले मेरिडियन हॉटेलच्या नवव्या मजल्यावर त्यांनी समर्थक आमदारांसह तळ ठोकला आहे. एकून ३० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोब असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना आजवरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहे. त्यामुळे या राजकीय भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदेंचा आमदारांसह गुजरात दौरा हा केंद्राचा प्लॅन असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला होता. त्यानंतर राज्यात केंद्रातील नेत्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता शिवसेना फोडण्यात केंद्राचा हात असल्याची चर्चा आहे. कारण शिवसेना आमदार भाजप शासित राज्य गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्राची सिमा पार करताच त्यांना गुजरात पोलिसांनी कडक सुरक्षा दिली. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले. त्या हॉटेलला देखील गुजरात पोलिसांचा पहारा आहे. त्यामुळे खेळाची चाल केंद्रातून रचल्याचे बोलल्या जात आहे.
या सर्व प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली. त्यांचा आज नाशिक दौरा नियोजीत होता. मात्र हायकमांडचा निर्णय आल्यानंतर त्यांनी तो रद्द केला. म्हणजे हे सर्व प्रकरण फडणवीसांना सुद्धा माहित नव्हते. फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची महत्वाची बैठक पार पडली. ते आज अहमदाबादला जातील. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपने कंबर कसली आहे. भाजप आपला एकाही आमदार फुटू नये यासाठी १०६ आमदारांना अहमदाबाद जवळील रिसॉर्टमध्ये ठेवण्यासाठी गुजरातला पाठवत आहेत. एकनाथ शिंदे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतची बैठक संपल्यानंतर ते उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवतील, असे सूत्रांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीनंतर हा सर्व गदारोळ झाला. दोन तुकड्यांमध्ये शिवसेनेचे आमदार मंगळवारी पहाटे सुरतला पोहोचले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
