नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातले कृषिमंत्री राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. पवारांसारखे नेत्याचं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच आहे, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.
सत्तार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर-कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांची दिनचर्या समजून घेतली, किती घाम गाळतो, किती रक्त जाळतो यावर ते चिंतन करतील. व आम्ही पण ते चिंतन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू, असा निर्धार त्यांनी केला आहे. शरद पवार हे देशाचे कृषिमंत्री राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. पवारांसारखे नेत्याचे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच आहे. राज्यपाल महोदयांनी सुद्धा शेतकऱ्यांसोबत काम केले आहे. तेही तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडेही मी आणि कृषी विभागाचा सचिव जाऊन मार्गदर्शन घेणार आहे, अशी माहिती अब्दुल सत्तार त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video : पंतप्रधानांचा पार्टीत धडाकेबाज डान्स , खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतप्त
- Chitra Wagh | “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बदलला सगळं…”; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल
- Amol Mitkari | “सुरत व गुवाहाटीतुन मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना…” ; मिटकरींचा शिंदे गटावर प्रहार
- SSC Scam | अर्पिता मुखर्जीकडे अर्धा किलो सोन्याच्या बांगड्या; ३१ विमा पॉलिसी तर ६० बँक खाती
- Udayanraje Bhosale | यंदाच्या गणेशोत्सवात साताऱ्यात डॉल्बी वाजलाच पाहिजे – उदयनराजे भोसले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

