Share

अखेर ठरलं ! आदित्य ठाकरे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आसल्याच स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी याविषयी भाष्य करताना ‘वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ‘ए प्लस’ मतदारसंघ आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारे या मतदारसंघातील दिग्गज एकाच मंचावर उपस्थित आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचं निश्चित करावं असं विधान केले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

पुढे बोलताना परब यांनी ‘ पण इथला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असंही जाहीर केलं. तसेच पुढे बोलताना परब यांनी आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार, असा शब्दही शिवसैनिकांना दिला. आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढले तर ठाकरे कुटुंबायातून निवडणूक लढलेले पहिले ते पहिले सदस्य असतील. त्यामुळे ते खरंच निवडणूक लढणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

दरम्यान, काल  शिवसेना गटप्रमुखांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!