टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.
शिवस्वराज्य यात्रा ही परळीमध्ये आली असता अमोल कोल्हे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ‘राज्यात पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आता यांना विचारायची वेळ आलीय… कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मझा? महिला अत्याच्यार, बलात्कार अशा सगळ्याच घटनेतील आकड्यात वाढ होत आहे. ही सारी सरकारच्या अपयशाची कबुली आहे असं विधान केले.
तसेच पुढे बोलताना कोल्हे यांनी मुख्यमंत्री म्हणतात शिवस्वराज्य यात्रा ही पराभवाची जत्रा आहे. याच मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवाव की तुमच्या पक्षाच्या २२ नेत्यांचे घोटाळे मुंडे साहेबांनी समोर आणले. हे करण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन अशी स्थिती बीडमध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी मिळत आहे ही संधी सोडू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, याच सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी ‘मी आपल्यासाठी जी सेवा मागील २४ वर्ष केली. त्याचे फळ मिळण्याची वेळ आज आली आहे. आता तुमच्या या लेकराला जिंकून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत माझ्या भागातला माणूस हा आर्थिक दृष्ट्या मोठा व्हायला हवा हेच माझं स्वप्न आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या… या भागाचा चेहरामोहरा पालटून टाकल्याशिवाय थांबणार नाही असं विधान केले आहे.
- जनतेच्या आशा-आकांक्षाना सुरुंग लावणाऱ्या सरकारला खाली खेचा : अमोल कोल्हे
- जनतेने नाकारलेल्या राज ठाकरेंवर सूड उगवून आम्हाला काय फायदा : फडणवीस
- राष्ट्रवादीच्या झेंड्याला आता भगव्या झेंड्याची जोड
- सत्ता आल्यावर सत्ताधाऱ्यांना पळता भूई थोडी करू : धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

