Share

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांची तब्येत खालावली

Published On: 

मुंबई : प्रसिध्द गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar health update) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आसल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २७ दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं असून डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच न्यूमोनियाही झालाय. त्यांना त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय ९२ वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची ९२ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.

लताजींच्या प्रकृतीसाठी लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ९२ वर्षीय गायिका यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 9 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्या लवकर बऱ्या होऊन घरी परतण्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!