मुंबई : उत्तराखंडमधील तेहरा गरवाल जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या एका काँग्रेस उमेदवाराने मतांसाठी अनोखी शकल लढवली आहे. प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन हा उमेदवार भिकारी समजून तरी मतदान करा, अशी विनवणी करताना दिसून येत आहे. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
आ. भातखळकर ट्विट करत म्हणाले, उत्तराखंडातील काँग्रेसचा एक उमेदवार घरोघर जाऊन “भिकारी समजून मत द्या” अशी मतदारांकडे मतांची भीक मागतो आहे. एकेकाळी देशावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या काँग्रेसला मोदीजीँना अक्षरशः “भिकेला लावले” आहे.’ असे अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1489862435117092866
पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनोख्या शक्कल लढवताना दिसत आहेत. उत्तराखंड राज्यातील तेहरी गरवाल जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत उभा असलेल्या धनीलाल शाह या काँग्रेस उमेदवाराने लोकांच्या दारावर जाऊन भिकारी समजून तरी मतदान करा, अशी विनवणी केली. काँग्रेस उमेदवाराच्या या अनोख्या प्रचाराची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या


