बीड: बीड जिल्ह्यातील पाली या गावच्या रहिवासी तारामती साळुंखे यांच्या कुटुंबाची वडीलोपार्जित जमीन महाराष्ट्र शासनाच्या पाठ बंधारे खात्याने संपादित केली मात्र त्या बदल्यात त्यांना मोबदला मात्र मिळाला नाही. गेली वीस वर्षे ते या मोबाडल्याचा मागणीसाठी सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.
दरम्यान तारामती यांच्या सासू यांनी मंत्रालयाचे हेलपाटे मारले. त्यातच एकदा मुंबईला त्यांचा अपघाती मृत्यू झाला. कायदेशीर लढाई झाली, निकाल त्यांच्या बाजूने लागला. परंतु मोबदला मात्र कागदावरच राहिला. त्यांचा हातावर मात्र प्रशासनाने वाटण्याची अक्षदा ठेवली. त्यानंतर त्यांचे पती अर्जुन साळुंखे यांनी पाठ बंधारे खात्यात हेलपाटे सुरू केले. परंतु त्यांना न्याय मात्र मिळाला नाही. शेवटी आपल्या हक्कांच्या पैशासाठी त्यांनी २० नोव्हेंबेर २०२० रोजी पाठ बंधारे खात्यासंमोर स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले. त्यांच्या पश्चात पत्नी तारामती साळुंखे आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
तारामती या न्याय मागण्यासाठी दि. २६ जानेवारी २०२२ पासून त्या ज्या ठिकाणी त्यांच्या पतीला अग्नि दिला तिथेच स्मशान भूमीत आंदोलन करण्यास बसल्या आहेत. आता त्या माऊलील तिथे बसून दहा दिवस उलटले तरी गेंडयाच्या कातडीचे मंत्री आणि अधिकारी यांना त्यांची दखल घेण्यास वेळ मिळाला नाही. ते तारामती यांचा सुद्धा जीव कधी जातोय याची वाट पहात बसले आहेत.
महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणाची दखल केव्हा घेणार ? बीड जिल्ह्यातील भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे या प्रकरणाची दखल घेणार का ? आणि राज्य महिला आयोग काय कारवाई करणार यांची सर्वानाच प्रतीक्षा आहे. अतिरेक्यांसाठी जीवाचा आटापिटा करणारे मानव अधिकार आयोगवाले काय तारामती यमसदनी गेली की, न्याय मागत फिरणार का ?
या प्रकरणी सर्वच स्तरांतून उत्कट प्रतिक्रिया उमटत आहेत. कार्यारंभ या दैनिकांच्या संपादकांनी ‘धनुभाऊ बीड जिल्ह्याची मान शरमेने खाली जातेय’ या मथळ्याखाली तारामतीची कैफियत मांडली आहे. तसेच वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी प्रशासनाला गेंडयाच्या कातडीचे म्हणत, धनंजय मुंडे यांनी लाज सोडली का ? असा प्रश्न विचारला. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः या प्रकरणात अजून लक्ष का घातले नाही. सामान्य माणसाला त्याचे हक्क मिळवण्यासाठी मरावे लागत असेल तर ती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे.अश्या अन्यायाने जर त्या माऊलीच्या मुलांनी हातात शस्त्र घेत नक्षलवादी होण्याचे ठरवले तर त्याला कोण जबाबदार रहाणार?बीड जिल्हा नक्षलवादी करायचा आहे का राज्यकर्त्यांना?
महाताच्या बातम्या:
- “कोहली आणि कुंबळे यांचे जमत नव्हते” ; माजी व्यवस्थापकांचा गौफ्यस्फोट
- “…मगच निर्बंध शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार”, अजित पवारांचे स्पष्टीकरण
- “ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला”, आरोपींची पोलिसांसमोर कबुली
- सचिन तेंडुलकरने केले भारतीय क्रिकेट बद्दल एक मोठे वक्तव्य …
- राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

