🕒 1 min read
Neelam Gorhe। मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं आहे. जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी बंड पुकारलं आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांची ताकत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पक्षापुढे मोठं पक्षसंकट उभ ठाकलं आहे. काही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र याबाबत आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या कि, आम्ही आधीपासून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आलो आहोत. पण आता राजकारणाचा प्रांत वाढला आहे. कारण त्यात मोठे वादविवाद सुरू आहेत. ‘मी भगवद्गीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. जे आपल्यातून काही कारणाने निघून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि परत एक नदीचा प्रवाह होईल याची मला खात्री वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळावर भाष्य करताना गोऱ्हे म्हणाल्या,’ जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्या सरकारला ज्यावेळी शक्य होईल त्यांनी तो करावा. पण यात कायदा नक्की काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असतं. तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराबाबत बोलताना नामांतरांसारखे विषय हे लोकांच्या मनात रुजलेले आहेत. त्यामुळे अशावेळी अल्पमत, बहुमताचा विचार करायचा नसतो, असे मत गोऱ्हे यांनी जिल्ह्याच्या नामकरणावर व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG : सिराज जोमात इंग्लंड कोमात! जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मिळालं स्थान
- SL vs PAK : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ मोठा विक्रम, बनला नंबर वन फलंदाज; वाचा!
- IND vs ENG : निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- Deepali Sayed : “शिवसेनेतील दोन्ही गटांना पुन्हा एकत्र यायचंय, पण…”- दीपाली सय्यद
- Prakash Ambedkar : “काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण…”, प्रकाश आंबेडकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
